सर आयझॅक न्यूटन
सर आयझॅक न्यूटन
1642 यावर्षी गॅलिलिओ मरण पावला. त्याच वर्षी जन्मलेल्या न्यूटनचे बालपण लहानपणी वादळीचंच गेलं. त्याच्या वडिलांचे नावही आयझॅक होते. जन्मापूर्वीच वडील मरण पावले, त्यात अशक्तपणामुळे लहानपणीच मरता मरता कसं बस वाचले, आईचा दुसरे लग्न करून न्यूटनला आजोळी ठेवणं, तिथेही त्याला प्रेम न मिळणे वगैरे कारणांमुळे त्याच्यावर खोलवर परिणाम झाला. आईला आणि सावत्र वडिलांना घरासकट जाळून टाकण्याच्या धमक्याही न्यूटन दिल्या होत्या आणि न्यूटनला आईचा राग येणं स्वाभाविक होतं. दुसरा नवरा वारल्यावर त्याची आई तिच्या दुसऱ्या लग्नापासून झालेल्या तीन मुलांना घेऊन लिंगन शायर मधल्या त्याच्या वडीलोपार्जित इस्टेटवर परतली. दोन वर्षांनी तिने न्यूटनला चक्क शेती करायला पाठवलं. पण न्यूटनला ते काही जमेना. मंग मामाच्या सल्ल्याने न्यूटन केंब्रिजला शिकायला गेला. या सगळ्यामुळे न्यूटन खूपच एकलकोंडा बनला होता. अगदी लहानपणी त्याला घरातल्या नोकराबरोबर बाजारात हाकलला जाई. पण तो वाटेतच कुठेतरी बसून पुस्तक वाचत बसे. आणि परत येताना पुन्हा नोकरासोबत परत येई. घरच्यांना या गोष्टीचा पत्ताच नसे.
खरंतर त्याच्या आईला तिच्या पहिल्या नवऱ्याकडून बऱ्याच मेंढ्या मिळाल्या होत्या. तिच्या दुसऱ्या नवऱ्याकडून तर तिला प्रचंड पैसा मिळत होता. त्याकाळी तिला दरवर्षी 700 ते 900 पाऊंड मिळत. तेव्हाचे हे पैसे म्हणजे एखाद्या सरदाराच्या किंवा उमरावाच्या मिळकती एवढे होते. पण तरीही न्यूटन जेव्हा त्रिनिटी कॉलेजमध्ये गेला तेव्हा त्याच्याकडे अजिबात पैसे नसायचे. आईही त्याला ते देत नसे. एवढं असूनही आईच्या शेवटच्या आजारपणात न्यूटन तिची खूप सेवा केली. पण शिक्षणाच्या वेळी मात्र इतर विद्यार्थ्यांची कामे करून त्यांची सेवा करून तो पैसे मिळवी. सगळेजण जेऊन उठले की जे उरलेसुरलं शिल्लक राहील त्यावरच मग तो कसं बस पोटभरे. एकाकी आणि अशक्त अशा न्यूटनने शाळेत चिडून एका खूप थोराड मुलाला बराच चोप दिला होता. न्यूटन काय काय गमतीही करे!!
पतंगाला कंदील लावून रात्री उडवून लोकांना घाबरवून सोडे. न्यूटन लहानपणापासून उत्तम उत्तम खेळणी बनवायचा. पळणाऱ्या उंदराच्या गतीमुळे चालणारी पवनचक्की ही त्याने बनवली होती. पुढे केंब्रिजला गेल्यावर व्हिकीन्स या मुलाशी त्याची झालेली मैत्री वीस वर्ष टिकली. ते एकत्र राहत असल्याने समलिंगी असण्याच्या वावड्या ही त्यांच्याविषयी उठल्या होत्या. भूमितीच्या पेपर मध्ये खूपच चुका केल्याने 1663 मध्ये शिष्यवृत्तीच्या परीक्षेत नापास झाला होता. खेळ गप्पा आणि करमणूक यांच्यापासून नेहमी तो दूर असे. तो रात्री दोन तीन वाजेपर्यंत अभ्यासच करत बसे. तो चित्रकलेला हुशार लोकांचा मूर्खपणा आणि शिल्पांना दगड्यांच्या बाहुल्या म्हणायचा .
कित्येकदा तो जेवणही करायला विसरायचा. त्याचे गणिताचे गुरु सर आयझिंकब्युरो यांनी न्यूटनची बुद्धिमत्ता ओळखून लिंक एशियन प्रोफेसर या पदाचा राजीनामा दिला. वयाच्या 26 व्या वर्षी न्यूटन प्रोफेसर बनला. लोक त्याचा विसरभळा स्वभाव बघून त्याला विसर भोळा प्रोफेसर असे म्हणत. न्यूटन जेव्हा एका वर्गाला लेक्चर दिले तेव्हा त्याला त्या लेक्चरला फक्त तीन मुलं हजर होती. दुसऱ्या लेक्चरला तर एकही मुलगा नव्हता. पण हट्टानं न्यूटन पूर्ण रिकाम्या वर्गाला पुढची 17 वर्षे सगळी लेक्चर दिली.
आपल्या घरी असलेल्या मांजर साठी आणि तिच्या पिल्लांसाठी एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाता येण्यासाठी त्यानं मोठ्या मांजरीसाठी मोठं मी लहान मांजरीसाठी लहान अशी दोन भोक आपल्या भिंतीला पाडली होती. अशी दंतकथा प्रसिद्ध आहे.
न्यूटनच्या गतीचे नियम नियम गंमत. न्यू काही लोकांनी दिलेल्या 180 दशकात नंतरच्या ग्रहांनी त्या वेळच्या माहितीतल्या ग्रहांचा आणि वस्तुमानांचा वापर करून प्रत्येक ग्रहावरच्या इतर सर्व गोष्टींवर बल पडेल आणि त्यांच्या भेदक बेरजेमुळे त्याचा उपयोग होईल. पण हस गडबड व्हायला पाहणी पाहणी पाहण्यासाठी पाहणे ही गणिताने काढलेली भ्रमण कक्षेपेक्षा पाहणी आहे. मग असंतुष्ट का ? ) याचा अर्थ असा ग्रह असणं आपण समजतो यापेक्षा जास्त जास्त जोर दिला पाहिजे.
आपल्याला अजून न दिसलेला न सापडलेला आणखीनही एखादा ग्रह तर नसेल? यावर मग बऱ्याच वादच चर्चा मारामाऱ्या झाल्या. शेवटी फ्रान्सचा आणि इंग्लंडचा शास्त्रज्ञ यांनी गणित मांडून यांनी भाकीत केलं की, न्यूटनचा सिद्धांत जर खरा असेल तर आणखी एक म्हणजे आठवा ग्रह ही असला पाहिजे. लगेचच दुर्बिणीतून निरीक्षण करण्यात आली. त्यासाठी मग प्रचंड परिश्रम लागलेच. पण माणसाचं कौतुकही काही त्यांना स्वस्थ बसू देईना. आणि शेवटी न्यूटनच्या नियमाप्रमाणे तो ग्रह चक्क सापडला! आणि हा नवा ग्रह म्हणजेच नेपच्यून! त्यामुळे साधारण दीडशे वर्षांनी सुद्धा पुन्हा जगाने न्यूटनला सलाम ठोकला!
Very nice information
उत्तर द्याहटवाUseful information
उत्तर द्याहटवाNice information
उत्तर द्याहटवाखूप छान माहिती आहे.
उत्तर द्याहटवाछान सोप्या भाषेत उत्कृष्ट माहिती सादर केली आहे
उत्तर द्याहटवाThank you for sharing this fascinating look at Isaac Newton's life. I found it both interesting and inspiring.
उत्तर द्याहटवाछान माहिती दिलीत
उत्तर द्याहटवाUseful information 👍
उत्तर द्याहटवा